logo

बाल विकास सेवा योजना मिरज प्रकल्पाकडील एकूण 31 गावातील अंगणवाडी मिनी सेविकाची 2 व मदतनिस 83 ही मानधनी रिक्त पदे भरण्य

बाल विकास सेवा योजना मिरज प्रकल्पाकडील एकूण 31 गावातील अंगणवाडी मिनी सेविकाची 2 व मदतनिस 83 ही मानधनी रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरू आहे. पात्र महिला उमेदवारांनी त्यांचे परिपूर्ण अर्ज दिनांक 15 जून 2023 ते 28 जून 2023 अखेर कार्यालयीन कामकाजा दिवशी सकाळी 9.45 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत सांक्षाकित प्रतिसह एकात्मिक बाल विकास सेवा योजना मिरज कार्यालयाकडे समक्ष पोहच करावेत. मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, असे एकात्मिक बाल विकास सेवा योजना पंचायत समिती मिरज चे बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
अंगणवाडी मिनी सेविका व मदतनिस ची भरण्यात येणारी गावनिहाय पदे पुढीलप्रमाणे. मिनी सेविका - सुभाषनगर मालगाव-1, मल्लेवाडी-1. मदतनिस - पाटगाव-1, आरग-9, लिंगनूर-2, खटाव-2, कळंबी-1, टाकळी-1, सावळी-1, तानंग-3, मालगाव-7, खंडेराजूरी-1, गुंडेवाडी-2, करोली एम-3, सिध्देवाडी-2, नरवाड-2, बेडग-5, सोनी-2, भोसे-4, डोंगरवाडी-1, संतोषवाडी-1, जानराववाडी-1, सलगरे-2, बेळंकी-3, विजयनगर-2, मल्लेवाडी-2, म्हैसाळ-8, बोलवाड-2, वड्डी-2, एरंडोली-7, बामणी-1, अंकली-2, ढवळी-1.
अंगणवाडी मिनी सेविका व मदतनिस पद भरतीसाठी अटी व शर्ती पुढीलप्रमाणे. मिनी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनिस या पदासाठी सरळ नियुक्तीसाठी महिला उमेदवाराची वयोमर्यादा दिनांक 28 जून 2023 रोजी 18 वर्षे पूर्ण व 35 वर्षाच्या आतील राहील. विधवा महिला उमेदवारासाठी ही वयोमर्यादा दिनांक 28 जून 2023 रोजी 18 वर्षे पूर्ण व 40 वर्षाच्या आतील राहील. मिनी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनिस या पदासाठी शैक्षणिक पात्रता किमान 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. महिला उमेदवार ही त्या महसुली गावची स्थानिक रहिवाशी असावी. या पदासाठी लहान कुटुंबाची अट लागू राहील. या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता व इतर अनुषंगिक पात्रता याबाबतचा सविस्तर तपशील दर्शवणारा नमुना अर्ज संबंधित ग्रामपंचायत, पंचायत समिती व बाल विकास प्रकल्प अधिकारी मिरज यांच्या कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर उपलब्ध असल्याचे प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.

48
3113 views
  
1 shares